आईविषयी खासदार ओमराजे निंबाळकर यांची कृतज्ञता व्यक्त म्हणाले...



धाराशिव |

माणसाचं पहिलं प्रेम आईच असते. पितृछत्र अचनाक हिरावल्यानंतर खंबीरपणे कुटुंबांच्या पाठीशी उभं राहून ते सावरण्याची ताकद माझ्या आईमध्ये आहे. आज मी राजकारणात असलो तरी कुठलाही मोठा निर्णय आईला विचारल्याशिवाय घेत नाही, अशा शब्दात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार तथा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी मातृदिना निमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.

आईचे आशिर्वाद घेताना फोटो ओमराजेंनी पोस्ट केला आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना 'तेरे नाम से शुरू, तेरे नाम पे खतम,' या गीताच्या ओळी टाकून आई हेच माझे सर्वस्व असल्याचे ओमराजे म्हणाले. माणसाचं पहिलं प्रेम हे आईच असते. पितृछत्र अचानक हिरवल्याने आमच्यावर आलेले संकट आईने पूर्ण ताकदीने परतवून लावले.

माणसाचं पहिलं प्रेम हे आईच असते. पितृछत्र अचानक हिरवल्याने आमच्यावर आलेले संकट आईने पूर्ण ताकदीने परतवून लावले. राजे साहेबांच्या जाण्याने आईने आईचे प्रेम आणि वडिलांची जवाबदारी या दोन्ही भूमिकेला न्याय दिला. एवढ्या कमी वयात कुंकू पुसले गेले तरी तिचे दुःख तिने बाजूला सारून आमच्या परिवाराची घडी बसवली.  ती स्वतः 7 वी पर्यंत शिकली तरी शिक्षणाचे महत्व जाणून तिने माझ्या 2 भावंडाना डॉकटर बनवून दाखविले. मला ही कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आजही आईचा सल्ला हा मोलाचा ठरतो.

केवळ आईमुळेच आमच्या घराला घरपण आणि शोभा आहे. देवाने जर एक वरदान माग असे सांगितले तर जन्मोजन्मी अशा आई वडिलांच्या पोटी जन्म मिळो एवढेच मागणे राहील.

माझ्या जीवनाचा सारांश सांगायचे झाल्यास आईच्या नावाने सुरू आणि आईच्या नावानेच संपन्न असे सांगता येईल. आज मातृदिन निमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा.

अशा स्वरूपाची पोस्ट सोशल मीडियावर ओमराजे निंबाळकर यांनी शेअर केली आहे.

Post a Comment

0 Comments