मुंबई |
राज्यातील लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पार पडले असून आता 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या आधीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 24 तासांत दुसरा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी रविवारी (25 मे) फेसबुवक पोस्ट करत आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आता युवती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान याही आपल्या पदाचा राजीनामा देणार असून त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबईतील गरवारे क्लब येथे या दोन्ही नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
0 Comments