महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या 20 मेला पार पडणार आहे. या निवडणुकीनंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
असे असताना अनेक नेत्यांनी लोकसभेत नेमक्या किती जागा जिंकता येतील? याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. त्यात आता शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडी नेमक्या किती जागा जिंकेल? याचा अंदाज वर्तवला आहे.
ठाकरेंना महाविकास आघाडी नेमक्या किती जांगा जिंकेल? असा सवाल करण्यात आला होता. यावर ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या 48 पैकी 48 जागा येणार आहे. 35 जागा येणार मग कोणत्या 13 जागा पडणार?मग आपण अंदाज काढतो. मी अंदाज पंचे कधी सांगत नाही. मी जिंकण्याची तयारी करतो. म्हणून सांगतो 48 पैकी 48 जागा जिंकू आणि 4 जूनला इंडिया आघाडीच सरकार येणार, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments