मुंडे, दानवे यांचा दारुण पराभव होणार; 'या' बड्या नेत्यांनी केला दावा


मुंबई |

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे पाच दिवस बाकी असताना दावे प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. प्रत्येक उमेदवार मीच जिंकून येणार असा दावा करत आहे. तसेच आपल्याच अलायन्सला अधिक जागा मिळतील असाही दावा करत आहे.

पण ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे पडणार असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे.

महाविकास आघाडीला राज्यात 32 जागा मिळतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपले आहेत. मराठवाड्यात महायुतीला एकही जागा मिळणार नाही. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे पडणार आहेत. परमेश्वर रावसाहेब दानवे यांचा बदला घेणार आहे, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे

Post a Comment

0 Comments