माढ्यात हरितक्रांती आणण्यासाठी भाजपलाच मतदान करा: आमदार बबनदादा शिंदे



माढा |

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ  अंजनगाव (उमाटे), उपळाई (बु), मौजे वडशिंगे, मौजे दारफळ सिना येथे प्रचार दौरा करत आमदार बबनदादा शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. 

माढा लोकसभा मतदारसंघात सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले. माढ्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला. यापुढे देखील माढा मतदारसंघाला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी  खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा लोकसभेत पाठवायचे आहे. आपल्या लोकसभा मतदारसंघातील कृष्णा फ्लड डायव्हर्षण योजना, सिना माढा उपसा सिंचन योजना, खैराव मानेगाव उपसा सिंचन योजना, भीमा सिना नदीवरील बॅरेजेस बांधणे असे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा संसदेत पाठवून जलसिंचन क्षेत्राची कामे पूर्णत्वास घेऊन जायचे आहेत.  त्यामुळे आपल्याला  खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कमळ या चिन्हा समोरील बटण दाबून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रसंगी अंजनगाव (उमाटे) येथील सुहास काका पाटील, बंडू नाना ढवळे, हनुमंत दादा पाडूळे, गणेश काशीद सर, सरपंच रामहरी आदलिंगे, विलास कौलगे साहेब, लिंबाजी पाडूळे, परमेश्वर भोरे, रमजान पटेल, इस्माईल पटेल, रमेश उमाटे, अंगद पाटील, अरविंद खोटे, सुधीर कणसे, नानासाहेब उमाटे तसेच उपळाई (बु) येथील शंभू मोरे, संदीप भैया पाटील, दगडू शिंदे, संजय नागटिळक, झाडबुके सर, अजितसिंह देशमुख,  शिवाजी काळे, मनोज गायकवाड, नानासाहेब शेंडे, संताजी पाटील, लक्ष्मण जाधव, धनाजी बेडगे, नागनाथ गुंड, शाहू दादा वाकडे, विकास बेडगे, नवनाथ माळी, प्रदीप चौगुले, प्रशांत इंगळे, आजिनाथ बेडगे, संदीप गोरे, मौजे वडशिंगे येथील बंडू नाना ढवळे,महेंद्र कदम सर, आबा ठोंबरे, ऊन्हाळे सर, विजयकुमार कदम, उदय कदम-उप सरपंच, अजित कदम, दत्ता जाधव सपंच, मधुकर ठोंबरे सर, बिभीषण कदम सर, जयदिप सावंत, लक्ष्मण ठोंबरे, रोहीत कदम, सुहास काका पाटील, अशोक काका लूनावत, अशोक शिंदे सर, शिवाजी बारबोले, आनंदराव उबाळे, कुमार शिंदे,  कुमार नवले, विठ्ठल शिंदे, शिवाजी उबाळे, सर्जेराव सुळे, मोहन गायकवाड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील विविध संस्थांच्या आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ मतदार बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments