धाराशिव |
पाेलीस भरतीची तयारी करीत असलेले दाेघे मित्र बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात गाेळाफेकचा सराव करीत हाेते. हा सराव सुरू असतानाच फेकलेला गाेळा मार्कींग करणाऱ्या मित्राच्या डाेक्यात लागल्याने गंभीर जखमी झाला.
जखमी अवस्थेत त्यास तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपस्थित डाॅक्टरांनी त्यास मयत घाेषित केले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दर्गाह परिसरातील गाझीपुरा भागातील रहिवासी असलेला तरूण मुस्तकीम जावेद काझी (२१) व त्याचा मित्र हे दाेघे मागील तीन-चार महिन्यांपासून पाेलीस भरतीची तयारी करीत आहेत. हे दाेघे गाेळाफेकचा सराव करण्यासाठी नियमितपणे श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात येत. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हे दाेघे क्रीडा संकुलात दाखल झाले. लागलीच गाेळा फेकण्याचा सराव सुरू केला. एकजण गाेळा फेकण्याचा सराव करीत असताना दुसरा त्याची मार्कींग करीत हाेता.
आलटून-पालटून हा सराव केला जात हाेता. गाेळाफेकचा सराव झाल्यानंतर मुस्तकीम जावेद काझी हा तरूण मार्कींगसाठी पुढे गेला. याचवेळी मित्राने गाेळा फेकला असता, ताे काझी याच्या डाेक्यात लागला. गंभीर मार लागल्याने ताे जमिनीवर काेसळला. जखमी अवस्थेत त्यास मित्राने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता, उपस्थित डाॅक्टरांनी त्यास मयत घाेषित केले. रात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर आनंदनगर पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. तपास पाेलीस करीत आहेत.
0 Comments