माढा |
माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करण्यासाठी अकलुजचे मोहिते - पाटलांचे हे कुटुंब सुद्धा बाहेर पडणार असून त्यांचा प्रचार दौरा नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री स्व. प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या स्नुषा सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांचा अकलूज शहरामध्ये घर ते घर प्रचार करणार आहे. यामुळे माळशिरस तालुक्यात नक्कीच याचा इम्पॅक्ट पडणार आहे; असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
0 Comments