निवडणुकीच्या कामात मद्य पिऊन झोपून राहणे भावले


नागपूर |

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्तव्याच्या ठिकाणी मद्य पिऊन आढळलेल्या आणि कामात कुचाराई करणा-या एक अधिकारी आणि एका कर्मचा-याला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निलंबित केले आहे. आज 7 एप्रिल रोजी या संदर्भात आदेश काढण्यात आले.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निलज येथे तपासणी चौकी तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी निवडणूक निरीक्षक खर्च आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यांनी त्या तपासणी चौकीला भेट दिली असताना कर्तव्यावर असलेले पवनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल.के. कुंभरे आणि कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक रामकृष्ण पढाळ हे दोघेही मद्य पिऊन झोपलेल्या अवस्थेत आढळून आले.

Post a Comment

0 Comments