मुंबई |
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेठी लोकसभा मतदारसंघातून दुसरी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, प्रियंका गांधी यांना रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज (30 एप्रिल) त्यांना अमेठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वायनाड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 3 एप्रिल रोजी केरळमधील वायनाड मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. तसेच, अमेठी लोकसभा मतदारसंघातूनही 2014 आणि 2019 साली राहुल यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.
दरम्यान, राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडमधून 4 लाखांहून अधिक मताधिक्याने विजय प्राप्त केला होता. पण त्याचवेळी अमेठीमध्ये त्यांना भाजपाच्या स्मृती इराणी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2014 सालीही मोदी लाटेत राहुल गांधी यांच्या अमेठीतील जागेवर स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना पराभूत केले होते.
0 Comments