सोलापूर |
माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या उमेदवारांच्या मुद्रित व इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातील जाहिराती व पेडन्यूजच्या नोंदी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीने व्यवस्थितपणे ठेवून त्याबाबतचा अहवाल खर्च समितीस नियमितपणे सादर करण्यात यावा अशी सुचना माढा लोकसभा निवडणूकीच्या जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी केली.
माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामधील जिल्हास्तरीय माध्यम प्रामाणिकरण व संनियंत्रण कक्षला माढा लोकसभा निवडणूकीच्या जनरल निरीक्षक रुपाली ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, संपर्क अधिकारी तथा लघुपाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता स्नेहलता गावडे , समिती सदस्य डॉ.श्रीराम राऊत,अंबादास यादव, रफिक शेख, सचिन सोनवणे , गणेश बिराजदार आदी उपस्थित होते.
माढा लोकसभा निवडणूक काळात जिल्हा माध्यम प्रमाणिकरण व माध्यम सनियंत्रण समितीचे कामकाज अतिशय महत्वाचे आहे.मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पेड न्यूज ,जाहिराती तसेच सोशल मीडियातील सर्व उमेदवार यांच्या प्रचारावरही या समितीने जबाबदारी व काळजीपूर्वक लक्ष ठेवणे गरजेचे आहे.तसेच वृत्तपत्रात येणाऱ्या संशयीत पेड न्यूज , जाहिरात शोधून संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात तो खर्च समाविष्ठ नियमितपणे करण्यात यावा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे कामकाज करुन समितीने दैनंदिन पेड न्यूजचा व जाहिरातींचा अहवाल खर्च समितीला सादर करावा असे सांगितले.
यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे कामकाज , इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापित करण्यात आलेल्या टी.व्ही.व रेडिओ युनिटचे कामकाज , सर्व नोंदी व रिपोर्ट कशा पद्धतीने केले जाते याविषयी समितीचे रफिक शेख , डॉ.श्रीराम राऊत व अंबादास यादव यांनी माहिती सांगितली तसेच सोशल मीडियाविषयी सविस्तर माहिती सोशल मीडियाचे समन्वयक गिरीश तंबाके यांनी दिली.यावेळी आप्पा सरवळे , धुळाप्पा जोकार , सुभाष भोपळे , शरद नलावडे , मिलिंद भिंगारे , ईलीहास ईनामदार ,संजय घोडके ,दिलीप कोकाटे ,भाऊसाहेब चोरमले , ईकबाल भाईजान ,नागेश दंतकाळे , राजेंद्र तारवाले , प्रविण चव्हाण , एम.एस.साठे , एस.एन.शेंडगे , अमोल घाडगे, प्रिया शहाबादे , पूजा बाबर , गौरी तंबाके , अमोल कोळी आदी उपस्थित होते.
0 Comments