मुंबई |
मराठी कला विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला जातो. मालिका विश्वातून प्रसिद्ध झालेल्या प्राजक्ताने सिनेविश्वात देखील घट्ट पाय रोवले आहेत. आज तिची स्वतःची एक विशेष ओळख आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हा’ यांसारख्या मालिकांसोबतच ‘रान बाजार’ सारखी दमदार वेब सिरीज आणि अनेक मराठी सिनेमे प्राजक्ताने गाजवले आहेत. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. त्यामुळे प्राजक्ताचा चाहता वर्ग फार मोठा आहे. जो तिला प्रेमाने ‘प्राजू’ म्हणतो. चाहत्यांच्या लाडक्या प्राजुने तिच्या नावाबाबत एक मोठा निर्णय घेत सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या खाजगी तसेच प्रोफेशनल आयुष्यातील अनेक अपडेट देताना दिसते. नुकतीच तिने अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ‘प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी’ असे लिहिलेले दिसत आहे. अर्थात तिने आपल्या नावात केलेला बदल या पोस्टच्या माध्यमातून दर्शवला आहे. आपले नाव बदलण्याबाबत तिने एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
0 Comments