मुख्यमंत्री माझी शाळा , सुंदर शाळा अभियानात महाराष्ट्र विद्यालयाचा डंका

बार्शी |

जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत ‘मुख्यमांत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यालय बार्शी या विद्यालयाचा सत्कार बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगरपालिका प्रशासन अधिकारी  अनिल बनसोडे, गट विकास अधिकारी माणिकराव बिचकुले, बार्शीचे गटशिक्षणाधिकारी  सुहास गुरव, बार्शी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी  जरीचंद चौधरी या मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह याठिकाणी करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments