जसप्रीत बुमराहचा कसोटी सामन्यात नवा विक्रम

भारताचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने बेन स्टोक्सची विकेट घेत कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला. सर्वात जलद 150 कसोटी बळी घेणारा तो पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहने विशाखापट्टणम येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली. बुमराहने केवळ 34 कसोटी सामन्यात 150 विकेट घेतल्या आहेत.

भारतासाठी सर्वात जलद 150 कसोटी विकेट्स घेण्याच्या बाबतीत आर अश्विन पहिल्या स्थानावर आहे. अश्विनने केवळ 29 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. या यादीत रवींद्र जडेजाचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. जडेजाने 32 कसोटी सामन्यात 150 धावा करण्याचा पराक्रम केला.

Post a Comment

0 Comments