अशोक चव्हाणांना होती ईडीची भीती - आमदार प्रणिती शिंदे


सोलापूर |

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशोक चव्हाण यांचा राजीनामा मंजूर केला आहे. अशोक चव्हाण हतबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला, असा दावा असा आरोप काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावरून केला आहे. भाजपा केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधी नेत्यांवर दबाव टाकण्यासाठी भाजपाव वापर करत आहे. भाजपा एकप्रकारे ब्लॅकमेल करत आहे, असा आरोप प्रणिती शिंदेंनी यांनी केला आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, “नुकतेच काँग्रेसचे मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यांच्या पाठोपाठ आता अशोक चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ही अतिशिय दुर्दैवीबाब असून भाजपाचे हे षडयंत्र आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा विरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी वापर केला जातो. हा एक प्रकारे ब्लॅकमेल करण्यात येत आहे. यातून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकावून त्यांना स्वत:कडे वळविण्याचा भाजपाचा प्रयत्न होत आहे. या त्रासपासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण हतबल होऊन काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला, असा दावा प्रणिती शिंदेंनी सोलापुरात माध्यमांशी बोलताना केला आहे.

Post a Comment

0 Comments