शिवजयंती निमित्ताने मोफत दंत तपासणी शिबीर, श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचा स्तुत्य उपक्रम



परंडा/प्रतिनिधी: 

शिवजयंती निमित्त श्रीमंत राजे प्रतिष्ठान कपिलापुरी व जायभाय दातांचा दवाखाना परंडा यांच्या वतीने मोफत दंत तपासणी शिबिर जी प प्रा शाळा कपिलापुरी या ठिकाणी राबवण्यात आले या शिबिराचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून करण्यात आले. श्रीमंतराजे प्रतिष्ठाणच्या वतीने धनाजी पाटील यांनी डॉ जायभाय यांचा शाल व  श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शिबिरामध्ये उपस्थित शालेय  विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी व रोग निदान करण्यात आले तसेच गावातील महिलांनी देखील मोफत तपासणीचा लाभ घेतला.

याप्रसंगी डॉ जायभाय यांनी निदान झालेल्या रोगांवर उपचार करण्यासाठी २०% सवलत देण्याचे जाहीर केले. शिवजयंती निमित्त डी जे - डॉल्बी वरील खर्च टाळून मोफत दंत तपासणी व औषधे वाटप करण्यात आले तसेच लहान मुलांमध्ये दातांच्या समस्या मोठ्या प्रमाणात होत असतात याचा विचार करून हे शिबीर घेण्यात आल्याचे अँड रणजीत पाटील यांनी सांगितले.
तसेच पाटील यांनी शिबीर पार पाडण्यासाठी डॉ जायभाय व जि प प्रा शाळा शाळेचे शिक्षक गरड व कुलकर्णी याचे आभार मानले.

याप्रसंगी श्रीमंतराजे  प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड रणजीत महादेव पाटील डॉ.नागेश जायभाय,एस व्ही कुलकर्णी धनाजी पाटील विलास भोसले सम्राट पाटील सुजित पाटील नितीन शिंदे संतोष डाके इ. उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments