व्हाईस ऑफ मीडियाच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी संदिप मठपती, तर सचिवपदी अस्लम काझी

बार्शी |

जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या बार्शी शहर आणि तालुका पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात आली. राज्य कार्यकारिणीचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ आणि जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे यांच्या मागदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकित खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड करण्यात आली. यात नूतन शहराध्यक्षपदी हर्षद लोहार, सचिव जमीर कुरेशी, तालुका अध्यक्षपदी संदिप मठपती, सचिव अस्लम काझी यांचा समावेश आहे.

इतर पदाधिकाऱ्यांमध्ये शहर कार्यकारिणीत विजय शिंगाडे (उपाध्यक्ष), ओंकार हिंगमिरे (खजिनदार) तालुका कार्यकारिणीत राहुल गुरव (उपाध्यक्ष), राहुल भालशंकर (कार्याध्यक्ष), मुझम्मिल कवठाळकर (खजिनदार) यांची निवड करण्यात आली. यावेळी कार्यकारिणी सदस्य शाम थोरात, प्रदिप माळी, निलेश झिंगाडे, समाधान चव्हाण, मयूर थोरात, प्रविण पावले, मल्लिकार्जुन धारुरकर, सागर गरड, शुभम गोवर्धन, शोएब बागवान, नितीन गाढवे, किशोर सोनवणे, ओंकार गायकवाड, असिफ मुलाणी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी अजित कुंकूलोळ यांनी जागतिक पातळीवर कार्यरत व्हाईस ऑफ मीडियाच्या दृढ संकल्पाविषयी विवेचन करुन संस्थेच्या नावलौकिकात भर टाकण्यासाठी सर्व सदस्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले. सदस्यांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी संस्था कटिबध्द असून लवकरच विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आगामी नियोजित कार्यक्रमांसाठीही सर्वांनी सज्ज रहावे अशा सूचना याप्रसंगी देण्यात आल्या. जिल्हा उपाध्यक्ष गणेश भोळे यांनी मनोगत व्यक्त करुन नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments