परंडा प्रतिनिधी -
राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्ताने युवकमित्र परिवार पुणे यांच्या वतीने ५ वे युवा संम्मेलन दि १३ जानेवारी रोजी पत्रकार भवन पुणे येथे पार पडले आहे.या संम्मेलनात युवकमित्र परिवार महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार यंदा कपिलापूरी (ता.परंडा) येथील अँड रणजीत महादेव पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे.
पत्रकार भवन पुणे या ठिकाणी पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक रंगनाथ नाईकडे (मुख्य वनरक्षक नागपूर सेवानिवृत्त),कार्यक्रमाचे अध्यक्ष अविनाश निमसे (संस्थापक बुक क्लब पुणे)कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह भ प प्रल्हाद महाराज डांगे (समाज प्रबोधन आनंदी ), सचिन म्हसे (सद्गुरू सेवा प्रतिष्ठाण पुणे ) तसेच युवकमित्र परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण महाजन यांच्या उपस्थितीत आशाताई भट्ट (अध्यक्षा मंथन फाउंडेशन पुणे), मंगलाताई नागुल (अध्यक्षा जय अंबामाता स्वयंरोजगार संस्था पुणे) यांच्या हस्ते अँड रणजीत महादेव पाटील यांना स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले आहे.
सामाजिक कार्य करत असताना कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेत असते. तशी दखल आजवर अनेक संस्थांनी घेतली व अनेक पुरस्कार प्रदान केले.पाटील यांना महाविद्यालयीन काळात १ तर सामाजिक सेवेच्या ६ वर्ष काळात सामाजिक क्षेत्रातले तब्बल ४ पुरस्कार व शासकीय २ वर्ष सेवेतील ३ पुरस्कार तसेच सामाजिक कार्यकर्ता म्हणून विशेष सन्मानित करण्यात आले आहे. शासकीय पुरस्कारापैकी नेहरू युवा केंद्र भारत सरकार यांच्या उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार , कोविड काळात केलेल्या सेवेचा संस्था क्षेत्रातील कोविड योद्धा सन्मान असे तीन पुरस्कार प्राप्त आहेत.
पुरस्कार मिळल्याने जबाबदारी वाढते व कार्य अधिक गतीने करावे लागते तसेच राष्ट्र उभारणीसाठी आपण सामाजिक कार्यात अधिक क्षमतेने कार्य मग्न राहू अशा दृढ विश्वास पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दाखवला.याप्रसंगी अँड समाधान लटके,अँड.दिगांबर कोथिंबीरे उपस्थित होते.
0 Comments