धाराशिव |
सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असलेले नवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जगदंबा देवी मंदिरास अकरा हजार रुपये किमतीची अकरा किलोची घंटा देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली, त्याचबरोबर सुदर्शन बालाजी मिंडे रा. भातंबरे ता.बार्शी जि.सोलापूर सध्या श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव येथे शिक्षण घेत असलेला विद्यार्थी याला नवनाथ सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने हिरो कंपनीची सायकल भेट देण्यात आली.
यावेळी नवनाथ वाचनालयाचे सचिव माणिकराव इंगळे, ग्रंथपाल सोमनाथ इंगळे, सेवानिवृत शिक्षक भागवत देशमुख, अनिल इंगळे, पत्रकार सुभाष कदम, अर्जुन इंगळे, प्रशांत मते, विनोद पवार, गोपाळ थोरात, सुहास खंडाळकर, आबासाहेब जाधव, बाळासाहेब झांबरे, सुनील तावस्कर, हनुमंत नलवडे, महादेव गायकवाड, मारुती सूर्यवंशी, रामलिंग वाघमोडे, आदी उपस्थित होते.
0 Comments