सोलापुरात लग्नादिवशीच नवरीची आत्महत्या


सोलापूर |

सोलापूरच्या कुमठे रोड परिसरातील ओम नमः शिवाय नगर येथे आज खळबळजनक घटना घडली. लग्नादिवशीच नवरी मुलीने आत्महत्या केली आहे. सालिया मेहबूब शेख (वय 25) असे तिचे नाव आहे. 

आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरी तिने बेडरूममध्ये
सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे
निदर्शनास आले. नातेवाईकांनी तिला खाली उतरून सिव्हील रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याबाबत सिव्हिल पोलिसांनी नोंद केली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments