शेतीच्या वादातून चुलत्याचा खून ; माढा तालुक्यातील धक्कादायक प्रकार


माढा |

१२ डिसेंबर रोजी टेंभुर्णी कुरणवस्ती शेवरे ता. माढा या ठिकाणी जमिनीच्या वादावरून शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५) यांचे निर्घृण हत्या राहत्या घरी दिनांक ११/१२/२३ सोमवार रोजी सकाळी १०.४० च्या सुमारास झाल्याचे समजले आहे.

सविस्तर माहिती अशी की, मौजे वडोली ता. माढा येथे शंकर प्रल्हाद जाधव व सुभ्राव जाधव यांच्या नावे असलेली ती जमीन आमची आहे असे शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबासाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव, अजित बाबासाहेब जाधव सर्व राहणार कुरणवस्ती शेवरे ता. माढा या चौघांनी राग मनात धरून घरात घुसून त्यांच्यावर कुराडीने सपासप घाव घालून मुंडके वेगळे केले व ते घेऊन पसार झाले. अशी माहिती नरहरी नवनाथ बंडलकर वय वर्ष 23 यांनी स्वतः डोळ्याने ही घटना लपून पाहिली अशी माहिती पोलिसांना दिली. 

त्यानुसार टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून महिला पोलीस उपनिरीक्षक मोनाली पवार व पोलीस उपनिरीक्षक गिरीष जोग हे तपास करत आहेत. अद्याप आरोपी फरार आहेत. आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मयत ताब्यात घेतले जाणार नाही असे मयत नातेवाईक यांनी माहिती दिली.

२४ तासांनी एक आरोपी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली असून पुढील तपास करीत असल्याचे सांगितले. यापूर्वी टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे दोन वेळा NC दाखल केलेली होतीव जीवितास धोखा असल्याचे सांगितले होते तरी देखील पोलीस स्टेशनने कोणतीही समज न देता आरोपीस पाठीशी घातले आहे. यामुळेच माझ्या वडिलांची निर्घृण हत्या झाल्याचा आरोप पत्रकार संरक्षण समितीचे माढा तालुका सचिव अमोल शंकर जाधव यांनी गंभीर आरोप केला. 

Post a Comment

0 Comments