मानवता संस्थेच्या रक्तदान शिबिरात 101 लोकांनी रक्तदान , अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम



बार्शी : बार्शी तालुक्यातील रातंजन येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने  अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजित केले होते. 

या शिबिरांची सुरवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपत्री शिवाजी महाराज यांच्या प्रमिलेला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते घालण्यात आला. विविध मान्यवरांचे यावेळी शाल, फेटा, नारळ, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. वैरागचे नगराध्यक्ष निरंजन भूमकर, नगरसेवक गोविंद ताटे , संभाजी बिग्रेटचे जिल्हाध्यक्ष,  सोमनाथ राऊत, समाधान बनसोडे मालेगांव सरपंच, शहाजी जाधव हत्तीचे सरपंच, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक सतीश वाघमारे माजी नगरसेवक, संस्थेचे सचिव बापू नागटिळक, उर्मिला काकी देशमुख, महादेव काटकर, सिद्राम नागरगोजे, डॉ. धीरज बनसोडे, सागर पारडे, संस्थेचे सचिव बापू नागटिळक,उर्मिला काकी देशमुख, मान्यवर उपस्थित होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून  श्री अशोक नागटिळक महाराज यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. त्याच बरोबर अनेक वाढदिवस साजरा केला जातो. या रक्तदान शिबिरामध्ये  101 लोकांनी रक्तदान केले. रक्तदान हे जीवन दान आहे. या शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष गौतम नागटिळक , संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी , बापू नागटिळक , योगेश इंगळे, निलेश गिराम , आकाश बनसोडे ,  ओंकार कांबळे, सुरज रसाळ, गौतम वाघमारे, अरविंद आतकरे, किरण खुरंगळे , गणेश लंगोटे , अक्षर राऊत, रणजित जाधव, श्रीराज हजारे, समाधान डवरी, रितेश नागरगोजे, किरण डोलारे , तसेच संस्थेचे पदाधिकारी , अशोक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. भगवंत बँड बँकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश जगदाळे, प्रसाद जगदाळे , राधिका बेले, रेणुका अंधारे , वैष्णवी शहा गडकर यांनी यशस्वी रक्त संकलन केले.सूत्रसंचालन प्रकाश जाधव तर प्रस्तावना आभार प्रदर्शन भैरवनाथ चौधरी यांनी मारले.

Post a Comment

0 Comments