भूम |
तालुक्यातील वालवडमध्ये एका घरावर आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील व्यक्तींना मारहाण करून साडेसात लाखाचा ऐवज लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी नामे- रामचंद्र लक्ष्मण शिंदे, वय ७२ वर्षे, रा. वालवड, ता. भुम जि. धाराशिव यांचे राहाते घराचा कडी-कोंडा अनोळखी आठ व्यक्तीने दि.२२ नोव्हेंबर रोजी १२.३० वा. सु. तोडून घरात प्रवेश करुन लोखंडी रॉडने फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादी यांचे पत्नीचे गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने तसेच कपाटामधील असे एकुण ३६ तोळे ५ ग्रॅम व रोख रक्कम २० हजार असा एकुण सात लाख पन्नास हजार किंमतीचा माल फिर्यादीस मारहाण करुन जबरीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रामचंद्र शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम ३९७,४५७, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
0 Comments