लातूर |
पती-पत्नीचे नात पवित्र मानले जाते. विश्वासावर हे नातं टिकत, मात्र या नात्यात संशयाने घर केले तर संसार उध्वस्त होतो. अशा अनेक घटना सतत समोर येत असतात. अशात लातूरच्या औसा तालुक्यातील शिंदाळवाडी येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
या ठिकाणी आपल्या पत्नीशी चुलत भावाचे अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पतीने स्वतःच्या 28 वर्षीय चुलत भावाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे. माझ्या बायकोसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत चुलत भावावर चाकूने सपासप वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रदीप पापा राठोड असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
0 Comments