सोलापूरच्या पोलीस अधिकारीची नांदेडहुन बदली होत नसल्याने आत्महत्या


सोलापूर |

 सोलापूरचे रहिवासी मात्र नांदेड येथे ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी शनिवारी पहाटे  कुमठा नाका येथील निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर आतील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून मयताच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याने हे प्रकरण आता गंभीर बनले आहे.

 मयताच्या पत्नीने पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून जोपर्यंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन संबंधिताला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

Post a Comment

0 Comments