मराठा समाज एक होत नाही, हे बोलणाऱ्यांना आजच्या गर्दीनं दाखवलं : जरांगे पाटील



जालन्यातील आंतरवाली सराटेमध्ये आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी उपस्थित आहेत. 100 एकरच्या मैदानात मनोज जरांगेंची सभा आयोजित करण्यात आली होती. काल (शुक्रवारी) रात्रीपासूनच सभास्थळी मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. 

छत्रपती शिवाजी महाराज की... राष्ट्रमाता जिजाऊ माता की... मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो... घोषणांनी संपूर्ण सभास्थळ दुमदुमून गेलं आणि मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वीच जरांगेंनी व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना खाली पाठवलं आणि सर्वांना सारखा न्याय असं ठणकावून सांगितलं. जरांगे पाटील म्हणाले की, व्यासपीठावरचे सगळे खाली जा, सगळ्यांना सारखा न्याय बाकीचे खाली बसलेत आणि तुम्ही इथं वर, मग मी जाईन हा तिथं, मी मराठ्यांत जात असतो मग खाली... असं सांगत मनोज जरांगे पाटलांनी सर्वांना व्यासपीठावरुन थेट खाली धाडलं.

Post a Comment

0 Comments