मुंबई |
टी शासन भरतीचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा भरती कृती समितीच्यावतीने सुशिक्षित युवकांनी लाक्षणिक धरणे आंदोलन सुरु केले आहे. मागील सहा दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून पकोडे, चहा व चिवडा विक्रीचा स्टॉल लावुन अनोख आंदोलन करण्यात येत आहे.
शासनाचे कंत्राटी पदभारतीचा शासन निर्णय काढल्यावर बेरोजगार युवकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वर्धेत नितेश कराळे यांच्या नेतृत्वात २६ सप्टेंबरला युवकांचा मोर्चा काढण्यात आला. त्यांनतर वर्धेच्या गांधी चौकात युवकानी धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आश्रमात युवक मौनव्रत सत्याग्रह करणार आहे. जेव्हापर्यंत हा शासन निर्णय सरकार परत घेणार नाही; तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याच युवकांनी सांगितलं.
आज धरणे आंदोलना दरम्यान करण्यात आलेल्या अनोख्या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे कटआऊट लावत त्याच्यावर उपहासत्मक टीका सुद्धा करण्यात आली. बेरोजगार पकोडेवाला, मोदी चायवाला नावाने स्टॉल लावुन हे आंदोलन केले. युवकांनी केलेले अभिनव आंदोलन हे सरकारला इशारा असून गांधी जयंतीच्या पूर्वी सविनय कायदेभंग आंदोलन असल्याच सांगितलं.
0 Comments