बार्शी :
बार्शी येथील माया गॅंगचा म्होरक्या विशाल रणदिवे याच्यावर बार्शी शहर पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन व व पुणे शहर पोलीस स्टेशन खंडणी अपहरण मालमत्ता जबरीने घेणे जबरी दुखापत बेकायदेशीर गैरमंडळी जमा करून दहशत निर्माण करणे अशा प्रकारचे दहापेक्षा अधिक गुन्ह्यात सहभाग होता.
विशाल रणदिवेने त्याची टोळी निर्माण करून गुन्हे करून दहशत निर्माण करत करून परिसरामध्ये वेगवेगळे गुन्हेही करत होता. त्याच्यावर हद्दपारची कारवाही करण्यात आली होती. हद्दपार असतानाही त्यांनी बार्शीत येऊन दोन गुन्हे केले. त्याला जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार येरवडा पुणे येथे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. विशाल रणदिवे याच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून येरवडा कारागृह येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, रेवननाथ भोंग, अमोल माने, मनीष पवार, रवी लगदिवे, अविनाश पवार सचिन देशमुख, मोहन कदम आदींनी केली आहे.
0 Comments