बार्शी|
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय व महाराष्ट्र विद्यालय बार्शी यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक ५ व ६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या . सदर स्पर्धेचे उद्घाटन श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय पी.टी.पाटील व खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत प्राचार्या के.डी.धावणे उपमुख्याध्यापक आर.बी.सपताळे, पर्यवेक्षक एस.सी. महामुनी, प्रा.सुरेश लांडगे, प्रा.किरण गाढवे,संजय पाटील,अनिल पाटील उपस्थित होते.
तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील १७ संघानी सहभाग घेतला. सदर स्पर्धा १४,१७ व १९ या वयोगटात स्वतंत्र मुले आणि मुली या मध्ये घेण्यात आल्या. स्पर्धा अत्यंत प्रसन्न, खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या.या स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे १४ वर्षे मुले वयोगट मध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी,द्वितीय क्रमांक माध्यमिक आश्रम शाळा खामगाव,१७ वर्षे मुले वयोगट मध्ये प्रथम क्रमांक माध्यमिक आश्रम शाळा खामगाव,द्वितीय क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी,१९ वर्षे मुले वयोगट मध्ये प्रथम क्रमांक उच्च माध्यमिक आश्रम शाळा खामगाव द्वितीय क्रमांक उच्च माध्यमिक आश्रम शाळा, वैराग.
मुलींमध्ये १४ वर्षे वयोगट मध्ये प्रथम क्रमांक महाराष्ट्र विद्यालय बार्शी. द्वितीय क्रमांक पोदार लर्न इंग्लिश स्कूल बार्शी,मुलींमध्ये १७ वर्षे वयोगट मध्ये प्रथम महाराष्ट्र विद्यालय बार्शी द्वितीय क्रमांक पोदार लर्न इंग्लिश स्कूल बार्शी,मुलींमध्ये १९ वर्षे वयोगट मध्ये प्रथम क्रमांक श्रीराम विद्यालय धोत्रे द्वितीय क्रमांक एम.आय.टी. ज्युनिअर कॉलेज बार्शी.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ.सुरेश लांडगे, क्रीडा शिक्षक अनिल पाटील, पुष्कराज पाटील, शिवराज बारंगुळे , योगेश उपळकर यांनी परिश्रम घेतले. तसेच स्पर्धा पार पाडण्यासाठी पंच व गुणलेखक म्हणून आदित्य माने, प्रकाश गवळी ,क्षितिज लांडगे, वैभव कोळी,रोहित झेंडे,मृणाल माने ,वैष्णवी शिराळकर यांचे सहकार्य लाभले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे,सचिव पी.टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्था सदस्य श्री.बी.के. भालके ,सर्व कार्यकारिणी सदस्य, सर्व संस्था सदस्य,महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्या श्रीमती के.डी.धावणे,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments