बार्शी |
शहर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी बार्शी शहर व तालुका यांच्या वतीने आयोजित आरोग्य शिबीराचे उद्घाटन बार्शी तालुक्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले.सदर शिबीरामध्ये नागरिकांच्या सर्व आरोग्य तपासणी करण्यात आला.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील देश सदृढ व आरोग्यसंपन्न बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असुन कोणीही पैशाअभावी आरोग्य सुविधांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
यावेळी बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरपालिका मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.रणवीर राऊत, डॉ.शितल बोपलकर, भाजपा बार्शी शहर प्रमुख महावीर कदम, माजी नगरसेवक संदेश काकडे तसेच वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत डॉक्टर,नागरिक उपस्थित होते.
0 Comments