अनोळखी व्यक्ती, भाडेकरूची माहिती पोलिस ठाण्याला द्या


सोलापूर 

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम144 अन्वये सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यातील सर्व घरमालक, प्रॉपर्टी डिलर, ब्रोकर, एजंट, मस्जिद, चर्च, धर्मशाळा, जुने वाहन विक्री खरेदी करणारे व्यक्ती व संस्था, भाडयाने वाहन देणारे व्यक्ती व संस्था तसेच धार्मिक स्थळांचे विश्वस्त व काळजीवाहक यांना खालील कृत्यांना बंदी घालत आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहेत.

कोणत्याही अनोळखी नवीन रहावयास येणाऱ्या व्यक्तींची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती तसेच सोलापूर ग्रामीण जिल्हयात जी व्यक्ती नव्याने राहण्यासाठी येईल अथवा रहावयास आल्यावर अथवा रहावयास येण्याबाबत विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस ठाणेला त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनोळखी व्यक्तींना रहावयास जागा पोलिसांना माहिती न देता उपलब्ध करुन देणे.

कोणत्याही अनोळखी नवीन जुने वाहन घेण्यास येणाऱ्या व्यक्तीची व त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपुर्ण माहिती तसेच जुने वाहन घेण्यासाठी विचारपूस केल्यानंतर लगेच न चुकता संबंधित पोलिस ठाणेस त्यांचे संबंधीची माहिती न देणे व अशा अनओळखी व्यक्तींची पोलिसांना माहिती न देत जुने वाहन खरेदी विक्री भाड्याने उपलब्ध करून देणे. पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या पत्रानुसार सदरचा आदेश 5 नोव्हेंबरपर्यंत सोलापूर जिल्हयाचे ग्रामीण हद्दीत लागू राहील, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शमा पवार यांनी निर्देशित केले आहे.

Post a Comment

0 Comments