अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणेश चतुर्थीचा मंगळवारी (19 सप्टेंबर) मोठा उत्सव झाला. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी अंबानी कुटुंबाच्या घरी हजेरी लावली. अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाच्या दर्शनासाठी पारंपरिक लूक केला होता. अभिनेत्री दिशा पटानी देखील बाप्पाच्या दर्शनासाठी अंबानी कुटुंबीयांच्या घरी गेली होती. यावेळी दिशानं केलेल्या लूकला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अंबानी कुटुंबीयांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या दिशानं गोल्डन कलरची साडी आणि मोकळे केस असा लूक केला होता. दिशासोबत मौनी रॉयनं देखील गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दिशानं केलेल्या लूकला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
"गणपतीच्या दर्शनाला जाताना असे कपडे कोण परिधान करतं?" अशी कमेंट एका नेटकऱ्यानं दिशाच्या व्हायरल व्हिडीओला केली. तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'दिशा पटानी खूप वेडी आहे, ती पूजेसाठी आली होती की, कुठल्यातरी चित्रपटाच्या पार्टीसाठी??'
0 Comments