गटविकास अधिकाऱ्यांच्या हस्ते परंडा येथे वृक्षारोपण

परंडा|

जिल्हा परिषद कॅम्पस - जिल्हा परिषद प्रशाला मुले, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा, तसेच जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या कॅम्पस मध्ये एकूण ३० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. 

हे वृक्षारोपण गटविकास अधिकारी संतोष नागटिळक व एनजीओ पश्चिम बंगालच्या श्रीमती बॅनर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. 

सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्री इंगळे सर, जिल्हा परिषद कन्या प्रशाला चे मुख्याध्यापक श्री पवार सर, जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री बांगी सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सय्यद मॅडम तसेच इंद्रावस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री गवळे सर, वृक्षमित्र श्री तानाजी मिसाळ सर, आप्पासाहेब बल्लाळ सर, श्री शशी माने सर तसेच सर्वच कॅम्पस मधील सर्वच शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या हस्ते सदर वृक्षारोपण करण्यात आले. अतिशय उल्हास पूर्ण वातावरणात 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला..

Post a Comment

0 Comments