बार्शी |
महसूल सप्ताह निमित्त बार्शीची तहसीलदार शेख यांच्या 'सैनिक हो तुमच्यासाठी' या फलकाचे अनावरण नारी येथे करण्यात आले. सर्व आजी, माजी सैनिक, वीर नारी व सैनिक कुटूंब यांचे स्वागत करणेत आले. त्यानंतर सैनिक हो तुमच्यासाठी या फलकाचे अनावरण करण्यात आले.
त्यावेळी विविध विभागाच्या एकूण ३६ पेक्षाही जास्त समस्या मांडण्यात आल्या. सदर समस्यांवर
तहसिलदार शेख यांनी समक्ष चर्चा करुन समस्यांचे निराकरण करणेचे दृष्टीने मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास बार्शी तालुका माजी सैनिक संघटना अध्यक्ष चांगदेव सुरवसे, सचिव शेख व सदर बहुसंख्य माजी सैनिक, तहसिल कार्यालयातील कर्मचारीवृंद उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ अधिकारी खांडवी शरद शिंदे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होणेकरिता बदे सुभाष निवासी नायब तहसिलदार, काझी ए. डब्लु. महसूल नायब तहसिलदार, मुंढे संजीवन निवडणूक नायब तहसिलदार, कोरके प्रताप मंडळ अधिकारी बार्शी यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments