पुणे |
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर आता आणखी एका भूकंपाची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.
आज देशाचे गृहमंत्री अमित शहा पुण्यात असून यावेळी जयंत पाटील यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलमध्ये अमित शहा आणि जयंत पाटील यांच्यात भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट अजित पवार यांनीच घडवून आणल्याचं सांगितलं जातंय.
0 Comments