विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा


मुंबई |

राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा  यांना कोळसा घोटाळा प्रकरणी 4 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विजय दर्डा यांना तुरुंगवास, मुलदा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. चे संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

1999 ते 2005 या कालावधीमध्ये  जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा युपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता. युपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.  या प्रकरणातील ही तेरावी शिक्षा आहे. या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंह यांना लिहिलेल्या पत्रात माहिती लपवण्याचा आरोप करण्यात आला होता. याच आधारावर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments