टेंभुर्णी |
शहरात अनेक दिवसांपासून सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या बेंबळे चौक येथे जानकी मेडिकलचे मालक अमोल चव्हाण सह तासगाव सांगली येथील अवैध झोपेच्या गोळ्या विक्री प्रकरणी सांगली पोलिसांनी अटक केली आहे.
डॉक्टरच्या परवानगी शिवाय झोपच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या तिघांची साखळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उघडकीस आणून टेंभुर्णी,वंजा्रवाडी, सांगली येथून तिघांना गजाआड केले आहे.यामध्ये एका औषध प्रतिनिधी व औषध दुकानदाराचा समावेश आहे गेल्या काही दिवसापासून झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याचे समोर आले होते डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तसेच त्यांची चिठ्ठी शिवाय झोपेच्या गोळ्यांची खरेदी औषधांच्या दुकानातून करता येत नाही सांगली मिरज शहरात नशेच्या गोळ्यांची खुलेआम विक्री होत असल्याची बाब काही दिवसापासून पोलिस खात्यासमोर आली असल्याने यावर पोलीस प्रशासन लक्ष देऊन होते.
मात्र गोळ्यांची नशा करून काही नशेबाज तरुणांकडून गुन्हेगारी कृती होत असल्याचे पोलिसांना निदर्शनात आले असल्याने ही बाब गंभीर असल्याचे लक्षात घेऊन तातडीने या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन याबाबत या गोळ्या विकणाऱ्या टोळीवर सापळा लावून नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांना अटक केली
त्यांच्याकडून नशेच्या गोळ्यांचा मुख्य स्त्रोत्र ज्ञात झाल्यावर मूळ साखळी गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अटक केलेल्या मध्ये शाहबाज उर्फ जग्वार रियाज शेख (वय 24) रा. साईनाथ नगर कर्नाळ रस्ता सांगली, सचिन सर्जेराव पाटील (वय 29 ) रा. वंजारवाडी ता. तासगाव आणि अमोल शहाजी चव्हाण (वय 38) रा. बेंबळे चौक टेंभुर्णी तालुका- माढा, जिल्हा-सोलापूर यांचा समावेश असून सचिन पाटील हा औषध विक्री आहे तर अमोल चव्हाण यांचे औषध दुकान आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय केवळ पाटील यांच्या सांगण्यावरूनच चव्हाण यांनी शेख याला जादा दराने नायट्रोजन फाईव्ह व नायट्रोव्हेट टेन या कंपनीच्या नशेच्या गोळ्या दिल्याची कबुली दिली असून नशेच्या गोळ्यांची विक्री करणारी साखळी उजेडात आणण्याचे काम जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, उपनिरीक्षक विशाल येळेकर, हवलदार विक्रम खोत, अनिल कोळेकर, बिरोबा नरळे, सागर लवटे, संदीप गुरव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
0 Comments