बार्शी | मोटर सायकल चोरी गजाआड ; ७ मोटरसायकल सह दोन लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत



बार्शी |

बार्शी शहर गुन्हे अन्वेषण शाखेने केले सोलापूर जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणारे दोन जण गजाआड केले आहेत. त्यांच्याकडून शहर पोलिसांनी  सात मोटरसायकली असा २ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील चोरीला गेलेले मोटरसायकल घेऊन दोन्ही इसम शिवाजीनगर बार्शी येथून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कुर्डूवाडी रोड येथे पाठलाग करून त्यांना पकडले. सुरुवातीला त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली विश्वासात घेऊन चौकशी केली असता भगवंत मंदिर बार्शी येथून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी गोपाळ महादेव निकम (वय ३०) राहणार भोईजे ता. बार्शी व खंडू चंद्रकांत सुरवसे (वय ३३) रा.जाहीरवाडी ता. जि. उस्मानाबाद यांच्याकडून बार्शी शहर, बार्शी तालुका, वैराग व सोलापूर या भागातून चोरी केलेल्या सात मोटरसायकली हस्तगत करून २ लाख ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा प्रकटीकरण बार्शीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, सहाय्यक फौजदार अजित वर्पे, पोलीस नाईक मनीष पवार, वैभव ठेंगल, अमोल माने, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, रविकांत लगदिवे, अंकुश जाधव सचिन देशमुख, अविनाश पवार, रतन जाधव यांच्या पथकाने केली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक मनीष पवार हे करत आहे.

Post a Comment

0 Comments