बार्शी सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय ; पैशासाठी आईचा खून करणाऱ्या आरोपी मुलास जन्मठेप



बार्शी |

आईचा खून केल्या प्रकरणी श्रीराम नागनाथ फावडे राहणार वाणी प्लॉट, बार्शी याला बार्शी येथील सत्र न्यायाधीश एल एस चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बार्शी शहर पोलिस स्टेशनचे हद्दीत आरोपी श्रीराम याने त्याची आई रुक्मिणी फावडे या त्याला पैसे देत नव्हत्या व पैशाच्या कारणावरून घरी सतत भांडणे होत होती, यामुळे आरोपीने रागाच्या भरात आईच्या डोक्यात दगड मारून ठार केले. त्याच्यावर दिनांक १३ ऑक्टोंबर २०२१ रोजी बार्शी शहर पोलिसात भारतीय दंड संहिता कलम ३०२,२०१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. सदरच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सदरील प्रकरणात अभियोग पक्षातर्फे अकरा साक्षीदार तपासण्यात आले, साक्षीदारांचा पुरावा व सरकार पक्षातर्फे श्रीमती राजश्री कदम यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी श्रीराम फावडे यास जन्मठेपेची शिक्षा व सात हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहिले तर, कोर्ट पैरवी बाळासाहेब चौधरी यांनी मदत केली. सदरील प्रकरणामध्ये तपासिक अंमलदार म्हणून रामदास शेळके यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments