"जिल्हा परिषद शाळा परंडा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न...!"



परांडा |

परंडा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे वृक्षारोपण उपक्रमांतर्गत पर्यावरण पूरक वृक्षाची लागवड करण्यात आली. तापमान रोखण्यासाठी वृक्ष लागवड करून वातावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे, त्यासाठी २५ जुलै रोजी तहसीलदार घनश्याम अडसूळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आली.

यावेळी पोलिस निरीक्षक भुजबळ, परंडा तालुक्याचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी खुळे, हाके साहेब, श्री घोगरे साहेब तसेच केंद्रप्रमुख भागवत घोगरे व  महादेव विटकर उपस्थित होते. 

जि.प.प्रशाला,परंडा चे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  आलमगीर सय्यद , मुख्याध्यापक इंगळे आर. बी.यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमास कन्या प्रशाला परंडाचे मुख्याध्यापक पवार डी. के.,उर्दू प्रशाळाचे मुख्याध्यापक बांगी ,उर्दू प्रा. शाळेचे मुख्याध्यापिक सय्यद यांची उपस्थिती होती.

शाळेतील सर्व शिक्षक माने एस एस, शिंदे एन.के., मिसाळ टी. डी.,श्रीमती घाडगे, खरात सर, पखाले सर , श्रीमती देशमुख, बल्लाळ सर यांच्या सहकार्याने सदरील कार्यक्रम पार पडला. सदरील कार्यक्रमास कन्या शाळेचे सूर्यवंशी सर, माळी सर,श्रीमती उसराटे, व श्री सुरवसे  तसेच उर्दू शाळे चे सर्व शिक्षक,  शिक्षिका उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments