राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमोल कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घटना घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी त्यांना दिला होता. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे समोर येत आहे.
0 Comments