गर्भपात आणि सेक्सच्या गोळ्या विक्री करणारा बार्शीचा तरुण पोलिसांच्या ताब्यात...



परंडा |

गर्भपात करण्याच्या प्रकरणात बार्शीतील एकजण भूम पोलीसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. परांडा येथे गर्भपाताच्या आणि सेक्सच्या गोळ्या विक्री करण्यासाठी आलेल्या बार्शीच्या एका तरूणाला परांडा येथे पोलीसांनी अटक केली आहे.

त्यामुळे आता बार्शीतूनच असे अवैध गर्भपाताचे एखादे मोठे रॅकेट चालविले जात आहे की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. बार्शीचा हा तरूण सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात अशा प्रकारच्या गोळ्या विकत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

त्यामुळे आता त्याच्याकडून कोणते औषध दुकानदार अशा गोळ्या खरेदी करत होते. त्या गोळ्या तो नेमक्या कोणाकडून आणत होता, याचाही तपास पोलीस करणार आहेत.

बार्शीतील सुभाषनगर परिसरात राहणारा आकाश ढोबळे हा तरूण परांडा शहरात एका कारमधून गर्भपाताच्या गोळ्या आणि एमटीपी किट सह सेक्सच्या गोळ्या घेऊन जात असल्याची माहिती अन्न व औषध विभागाचे निरीक्षक श्रीकांत पाटील यांना मिळाली. त्यांनी ढोबळेच्या हालचालीवर पाळत ठेवली.

शनिवारी तो कार घेऊन परांडा येथे येत असल्याची
माहिती पाटील यांना मिळताच त्यांनी सापळा लावला आणि परांडा बस स्थानकाजवळील रमाई चौकात त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या कारमध्ये या गोळ्यांचा मोठा साठा असल्याचे दिसले. या सर्व गोळ्या जप्त करण्यात आल्या असून त्याच्या विरोधात परांडा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिस निरक्षिक अमोद भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरक्षिक कवीता मुसळे, पोकॉ योगेश यादव, चालक पोकॉ कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली
आहे.

सदरील प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस
निरीक्षक कविता मुसळे करीत आहेत. तर या तपास कामात 
त्यांना पो. ना. बी. आर. काकडे, पोकॉ. एस. एम. कोळेकर, पोकॉ. रफीक मुलाणी, पोकॉ. योगेश यादव आदी सहकार्य करीत आहे.

Post a Comment

0 Comments