विवाहप्रसंगी टाळला अक्षताचा अपव्यय; बिया वाटून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश ; साखरे कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम

बार्शी |

नुकत्याच संपन्न झालेल्या साखरे व दिवटे यांच्या विवाहाप्रसंगी  अक्षतांचा वापर न करता लग्नामध्ये उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींना दोन्ही परिवारांच्या वतीने झाडांच्या बियांचे वाटप करण्यात आले. यामध्ये  ताम्हण, पारिजातक व बहाव या यासह इतर देशी जातीच्या पर्यावरण पूरक बियांचा समावेश होता.  या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने आठवणीने जिथे जमेल तिथे बिया रुजवाव्यात ही विनंती ही दोन्ही परिवाराच्या वतीने करण्यात आली आहे.

मुलांमुलींच्या विवाहसोहळ्याप्रसंगी वर व वधू परिवाराकडून  दिमाखदार सोहळा साजरा करण्यात आला.  अशातच नववधूवरांच्या डोईवरती अक्षतारूपी तांदुळ टाकून शुभाशिर्वाद देण्याची पूर्वापार परंपरा आपण मोठ्या आनंदाने पार पाडत आलो आहोत. याच गोष्टीला छेद देण्यासाठी विवाह सोहळ्याप्रसंगी अक्षता म्हणून तांदळाऐवजी पर्यावरण चळवळीला गती देण्यासाठी विविध देशी झाडांच्या बियांचे वाटप करण्यात आले. 'पर्यावरण रक्षणाची चळवळ पुढे नेऊया, आपणही हातभार लावूया!' असे आवहानही दोन्ही परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.

लायन्स क्लब माजी अध्यक्ष तथा सिल्व्हर ज्युबिली वरिष्ठ लिपिक राहुल साखरे यांचा विवाह सोहळा अनोख्या पद्धतीने संपन्न झाला.  या अनोख्या परंपरेचे सर्वत्र कौतुक होत असून अशाच पद्धतीने आपल्या आप्तस्वकियांच्या विवाहाप्रसंगी पर्यावरण संवर्धनासाठी सजग राहिले पाहिजे. या लग्नासोहळ्याला विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments