कत्तलीसाठी जात असलेल्या ५० जनावरांची सुटका करण्यात सोलापूर आणि वैराग येथील गोरक्षकांना यश


वैराग |

दिनांक २१ जून बुधवार रोजी मोहोळ वरून येणारा टेम्पो क्रमांक एम एच १३ ए एक्स ९६२९ हा मोहोळ वरून येत असल्याची गोपनीय माहिती गोरक्षक दल महाराष्ट्र राज्य सोलापूर व विश्व हिंदू परिषद बजरंग दल वैराग यांना मिळाली.

या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी वैराग येथील दहिटणे रोडवरील भूमकर यांच्या गॅस एजन्सी जवळ सदरील वाहन अडवून पाहणी केली असता त्यामध्ये कत्तलीसाठी जात असलेले जनावरे आढळून आली. सदरील वाहन आणि टेम्पो हा गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने पोलीस स्थानकात आणलेला असून वैराग पोलीस ठाण्यामध्ये पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments