आकाश दळवी यांच्यावर वाळू माफियाचा हल्ला ; सहा जणांवर गुन्हा दाखल



बार्शी |

अवैध वाळूचोरीला विरोध केल्याने बार्शी तालुक्यातील खांडवी गावच्या ग्रामपंचायत सदस्याला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वाळू माफियांनी ग्रामपंचायत सदस्याला बेदम मारहाण केल्याने बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनने या घटनेची नोंद घेतली असली तरी सदर प्रकरणातील जखमी दळवी हे बेशुद्ध असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवला गेला नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्यात आलेली नाही. दरम्यान, महसूल प्रशासन या सर्व प्रकरणावरून चिडीचूप आहे. त्यांनी या घटनेची अद्याप कुठलीही दखल घेतली नाही.


याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश पांडुरंग दळवी हे खांडवीचे ग्रामपंचायत सदस्य असून माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते आहेत. दळवी दि.१९ जून रोजी मध्यरात्री एक वाजता गावाशेजारील ओढ्याजवळून जात होते.त्यावेळी ओढ्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याचे पाहून आकाश दळवी यांनी ताबडतोब या चोरीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केले.यानंतर दळवी यांनी अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना अडविण्याचा प्रयत्न केला.

दळवींना पाहून वाळू उपसा करणारे ट्रॅक्टरचालक आणि जेसीबीचालक आपली वाहने घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आकाश दळवी यांनी वाळू माफियांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी वाळू माफियांनी आकाश दळवी यांना रस्त्यावर जबर मारहाण केली. या मारहाणीत दळवींच्या डोक्याला व हातापायांना जबर मार लागला असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.


आकाश दळवी हे जखमी झाल्यापासून अजूनही बेशुद्ध आहेत.दळवींवर सध्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. पण, दळवी बेशुद्ध असल्याने काहीही नोंद झाली नाही.ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांना संशयित आरोपींबाबत काहीही माहिती नाही. मंगळवारी आकाश दळवीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

या हल्ला प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये जिवी ठार मारण्याचा प्रयत्न व ॲट्रॉसिटी चालू हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपाधीक्षक जालिंदर नालकूल  हे  करत आहे.

Post a Comment

0 Comments