धाराशिव |
कैलास पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्यांस जिल्हा परिषदेला निवडुन दिल्यानेच ते जिल्ह्यातील नवे नेतृत्व म्हणुन उदयाला आले, त्यामध्ये चिखली व सांजा गटातील गावाचे खुप मोठ योगदान असल्याचे मत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यानी व्यक्त केले. चिखली (ता.धाराशिव) येथील जलजीवनच्या माध्यमातुन राबविलेल्या पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन व एकाचवेळी दहा जणांची भरती झालेल्या पोलीसांच्या सत्काराच्या सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, सरपंच वृंदावणी जाधवर, उपसरपंच उत्रेश्वर जाधव, रामकृष्ण मते, डॉ. सिध्देश्वर जाधव, रमेश जाधव, ज्ञानेश्वर जाधव, विकास जाधव, बापु जावळे, व्यंकट जाधव, संजय गोडसे, सचिन जाधव, पवन वाठवडे, नेताजी चव्हाण, नवनाथ बोंदर, बळीराम जाधव, रंगनाथ सावंत, तारक मते, साहेबराव जावळे, काकासाहेब खंडाळकर, समाधान जाधव आदीची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments