छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शंभुसेनेच्या वतीने क्रीडा साहित्य वाटप



[ सामाजिक कार्यात रणजीत महादेव पाटील यांची दातृत्त्वाची भूमिका  आदर्शवत -
आमोद भुजबळ पो.अ.पो.ठा. परंडा. ]

परंडा/ प्रतिनिधी -

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव निमित्त शंभुसेना महाराष्ट्र राज्य धाराशिव जिल्हा व श्रीमंतराजे प्रतिष्ठाण, कपिलापुरी यांच्या वतीने परंडा तालुक्यातील आसू येथे छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव ममोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 शंभूसेना महाराष्ट्र राज्य सेनाप्रमुख अतुल नाना माने पाटील व प्रदेशाध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शंभू राजे जन्मोत्सवा निमित्त शंभुसेना धाराशिव जिल्हाध्यक्ष अँड रणजीत महादेव पाटील यांच्या हस्ते परंडा तालुक्यात क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.यामध्ये मौजे आसू,क्रांती करिअर अकॅडमी परंडा,परंडा पोलीस ठाणे परंडा इ ठिकाणी क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.

युवकांच्या खिलाडू वृत्तीला चालना मिळावी,शारिरिक हालचाल होऊन व्यायाम व्हावा, निरोगी आरोग्य राहावे व दररोज च्या कामातून विरंगुळा व्हावा या उद्देशाने हे क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले आहे असे जिल्ह्याध्यक्ष अँड रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.तर परंडा पोलीस अधीक्षक आमोद भुजबळ यांनी युवकांनी सामाजिक कार्य करण्यात पुढाकार घ्यावा व श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शंभुसेना धाराशिव जिल्हाध्यक्ष अँड रणजीत महादेव पाटील,परंडा तालुका अध्यक्ष शशीकांत खुणे ग्राप.स.आसू क्रीडा प्रशिक्षक रामेश्वर चोबे,क्रांती करिअर अकॅडमी परंडाचे सर्वेसर्वा पांडुरंग कोकणे, शंभुसेना शाखा आसू पदाधिकारी
सागर बुरंगे, सुजित जाधव ग्रा प.स.आसू ,ज्ञानेश्वर दबडे, शुक्राचार्य जाधव, कालिदास बुरुंगे, पंकज जाधव, निखिल खुणे,अनिल पवार ,राहुल पवार, सतोष पवार, चैतन्य खुणे, अनिकेत परदेशी ,ज्ञानेश्वर बुरुंगे, योगेश जाधव, रोहन जाधव, प्रवीण नलवडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments