बार्शी |
जातिवाचक शिवीगाळ करून जीवे, ठार मारण्याची दिलेले धमकीतील गुन्ह्यातील आरोपीस बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहरबान जयेंद्र सी जगदाळे यांनी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
यात हकीकत अशी की दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याचे सुमारास उपळवाटे येथील भवानी मंदिरासमोर असलेला लाईटच्या डीपी वरून आरोपी हरिदास पंडित खूपसे व फिर्यादी आणि त्याचे भाऊ यांचे लाईट कनेक्शनच्या कारणावरून बाचा बाची व जातिवाचक शिवीगाळ झाल्याने आणि आरोपीने जातीवरून तुम्ही लय माजला आहे आजचा कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला बघतो असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ करून निघून गेला अशा आशयाची फिर्याद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दिनांक ९ एप्रिल २०२३ रोजी ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेली होती, त्यातील आरोपीने एस के लोणकर यांचे मार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मेहरबान जयेंद्र सी जगदाळे यांचे न्यायालयात अटकपूर्व जामीन दाखल केला.
त्यावेळी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे काही न्यायनिवाडे हजर करून सदरचा गुन्हा प्रथमदर्शनी सिद्ध होत नाही असा युकतीवाद केल्याने व तो युकतीवाद मेहरबान न्यायालयाने ग्राह्य धरून सदरील आरोपीस अटकपूर्व जामीन विना शर्त मंजूर केला आहे या कामी आरोपी अर्जदार यांच्या वतीने एस के लोणकर वकील साहेब व योगीराज बारवे टेंभुर्णी आणि गणेश देशमुख वकील साहेब माढा यांनी न्यायालयाचे कामकाज पाहिले तर सरकारी पक्षातर्फे आबासाहेब बोचरे यांनी काम पाहिले.
0 Comments