आरोपीस सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी बार्शी सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा


बार्शी |

माढा तालुक्यातील अवैध चोरटी वाळू वाहतुक रोकण्यासाठी तहसिलदार यांनी मंडळ अधिकारी नागेश सोनवणे, तलाठी प्रशांत जाधव व प्रशांत तेरकर यांची भरारी पथकात नेमणुक केलेली होती. सदर भरारी पथक दि ३०/०५/२०१६ रोजी अवैध चोरटी वाळू वाहतुक  करणा–या वाहनांवर कारवाई करण्यासाठी टेंभूर्णी हद्दीत थांबलेले असताना रात्रौ ११/३० वा चे सुमारास पंढरपूर कडून येणारा वाळुने भरलेला टिपर थांबवून त्याच्याकडे रॉयल्टी पावती बाबत चौकशी करून पावती नसल्याने कारवाई साठी टिपर घेवून जात असताना टेंभूर्णी हद्दीतील सोलापूर पुणे रोडवरील अतिथी हॉटेलसमोर रोडवर आरोपी युवराज भिमराव पाटील वय २९ वर्षे रा अकोले खुर्द ता माढा याने पांढरे रंगाची बोलेरे जीप टिपर समोर आणून आडवी लावून भरारी पथकातील कर्मचारी यांना म्हणाला की, तुम्ही वाळूची गाडी घेवून जायची नाही घेवून गेलात तर तुमच्याकडे बघावे लागेल.


त्यावेळी भरारी पथकातील कर्मचारी यांनी त्यांची ओळख सांगून आम्ही सरकारी काम करीत आहोत, तुम्ही आम्हाला सरकारी कामात अडथळा करू नका असे समजावून सांगत आरोपीने भरारी पथकातील कर्मचारी यांना तुम्हाला मी बघून घेणार आहे ही गाडी कशी नेता तेच बघतो असे म्हणून फिर्यादी नागेश सोनवणे यांना धकाबुक्की करून धमकी दिली यामुळे फिर्यादीने आरोपीविरूध्द टेंभूर्णी पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३५३,३४१,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीसांनी
आरोपीस ताब्यात घेवून सबळ पुरावा गोळा करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.


सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी ५ साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी व साक्षीदार यांची साक्ष तसेच तपासी अंमलदार पो.हे. कॉ/ एस. पी आटपाडकर यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे हे सहा सरकारी वकिल श्रीमती
राजश्री कदम यांनी न्यायालयासमोर मांडले. सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार
करता  अति. सहा. जिल्हा न्यायाधीश एल. एस चव्हाण यांनी आरोपी युवराज भिमराव पाटील वय २९ वर्षे रा अकोले खुर्द ता माढा यास भादविक ३५३ अन्वये दोषी ठरवून ३ महिन्याची कैद व ५,००० / - रू दंड सदर दंड न भरल्यास ४ महिन्याची साधी कैद, भादविक ३४१ अन्वये दोषी ठरवून १ महिन्याची कैद व ५०० / - रू दंड सदर दंड न भरल्यास १ महिन्याची साधी कैद, भादविक ५०६ अन्वये दोषी ठरवून १ महिन्याची कैद व ५०० /- रू दंड सदर दंड न भरल्यास २ महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

सरकार पक्षा तर्फे अॅड. श्रीमती राजश्री कदम यांनी काम पाहीले. सदर केसमध्ये विशाल हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा व  सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक टेंभूर्णी पोलीस ठाणे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. सदर गुन्हयाचा तपास पो.हे. कॉ/ एस. पी आटपाडकर यांनी केलेला होता. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ अमृत खेडकर यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments