धाराशिव |
धाराशिव जिल्ह्यातील ८ तालुक्यातील बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीस मतदारांनी कौल देत जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला असल्याचे निकालाद्वारे दाखवुन दिले आहे. जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर व भूम वगळता उर्वरित कळंब, उमरगा, मुरुम, परांडा आणि वाशी या सर्व बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.
राज्यात शिवसेना (शिंदे गट) व भाजपा यांचे सख्य असताना देखील धाराशिव जिल्ह्यातील बाजारसमित्यांमध्ये मतदारांनी या अभद्र युतीस नाकारले असल्याचे निकालातून स्पष्टपणे दिसून येते. सर्वसामान्य शेतकरी अवकाळी पाऊस, गारपीट, नापीकी आदी समस्यांनी त्रस्त असतानादेखील त्याकडे पध्दतशीरपणे पाठ फिरविणाऱ्या सरकारला या निवडणुकांमधून नाकारले आहे. जिल्ह्यातील ८ बाजार समित्यांपैकी ५ बाजारसमित्यामध्ये महाविकास आघाडीकडे आल्या असून पालकमंत्र्यांना त्यांच्या स्वत:च्या तालुक्यातील बाजारसमितीवर वर्चस्व राखता आले नाही.
जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीकरीता शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन करुन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच कळंब-धाराशिवचे आमदार श्री. कैलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढविण्याचा निर्णय घेवुन जिल्हाभरातील सर्व बाजार समित्यांतून महाविकास आघाडीतर्फे उमेदवार रिंगणात उतरविले.
या विजयासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या महाविकास आघाडीच्या माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील, माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार बसवराज पाटील, केशव ऊर्फ बाबा पाटील, माजी नगराध्यक्ष नंदुभैय्या राजेनिंबाळकर, शिवाजी आप्पा कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश दाजी बिराजदार, काँग्रेसचे सुनिल मालक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिवनराव गोरे, प्रतापभैय्या पाटील, सुरेश पाटील, श्रीधर भवर, बापूराव पाटील, धीरज पाटील, विश्वास शिंदे, बसवराज वरणाळे, सुरेश वाले तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने जिल्हाभरातील ५ बाजार समित्यांवरती वर्चस्व राखता आले. महाविकास आघाडीतर्फे निवडुन आलेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले तसेच महाविकास आघाडीवरती विश्वास ठेवून मतदान केलेल्या सर्व मतदार बंधु व भगिनींचे महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानन्यात आले आहेत
0 Comments