सोलापूर |
सोलापूर शहरातील आसरा चौक येथील व्हिडीओ गेम
सेंटरमध्ये भर दिवसा एका तरूणाचा चाकू भोसकून खून करण्यात आल्याची घटना गुरूवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. अभिजीत कोल्हाळ (वय ३० रा. सध्या कर्णिक नगर) असे मृत तरूणाचे नाव आहे.
आसरा चौकातील एका इमारतीच्या गाळ्यात दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अभिजीत कोल्हाळ याच्याशी वाद झाल्याने त्याला प्रभाकर नावाच्या आरोपीने चाकूने सपासप वार केले. यामुळे अभिजीत हा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो जागेवरच बेशूध्द झाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
0 Comments